Chhattisgarh Assembly Polls 
देश

Chhattisgarh Assembly Polls: छत्तीसगडसाठी काँग्रेसकडून 53 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसने बुधवारी छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५३ उमेदवारांचा समावेश आहे. दोन दिवसापूर्वी काँग्रेसने ३० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. (Congress on Wednesday released its second list of 53 candidates for the Chhattisgarh assembly polls)

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यामध्ये निवडणुका पार पडणार आहेत. ७ आणि १७ नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. राज्यात भूपेश बघेल यांची सत्ता आहे. पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. विविध सर्व्हेमध्ये भूपेश बघेल यांनाच पुन्हा जनता संधी देईल असा अंदाज वर्तवला आहे.

काँग्रेसने बुधवारी दुसऱ्या यादीत ५३ उमेदवारांची घोषणा केली असल्याने, आतापर्यंत काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या ८३ झाली आहे. काँग्रेसने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या पाच राज्यातील मतदान नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडले. तर सर्व राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला लागेल. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. राजस्थानमध्येही काँग्रेसची सत्ता आहे, तर तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीचे सरकार आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

Akola News: शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहसीन शेख यांच्या मृत्यूने खळबळ; अपघात की कट ?, माजी जिल्हाप्रमुखांवर कुटुंबीयांचा थेट आरोप

Who Is Yash Thakur? आईची भीती अन् भारताला मिळाला नवा स्टार! 'वुशू'चे मैदान सोडणारा विदर्भाचा यश कसा बनला फास्ट बॉलर?

Whatsapp New Features : व्हॉट्सॲपने केला मोठा धमाका! 'या' युजर्सना मिळतायत जबरदस्त फीचर्स; PDF एडिटिंगसुद्धा सामील

FDA Action: तुकाराम मुंढेचा कारवाईचा धडाका! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त, १५ हून अधिक उत्पादनांवर बंदी

SCROLL FOR NEXT