Sonia Gandhi esakal
देश

काँग्रेस अध्यक्ष कोण होणार? शनिवारी पक्षाची महत्वपूर्ण बैठक

सकाळ डिजिटल टीम

संघटनात्मक बदलासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसनं शनिवारी बैठक बोलावलीय.

संघटनात्मक बदलासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसनं (Congress Party) शनिवारी सरचिटणीस आणि प्रभारींची बैठक बोलावलीय. सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रभारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विशेष सदस्यत्व मोहीम, संघटनात्मक बदल आणि आंदोलन कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाचे G-23 नेते संघटनात्मक बदलासह पक्षातील अंतर्गत सुधारणांसाठी जोर देत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मंगळवारी G-23 नेते आनंद शर्मा, मनीष तिवारी आणि विवेक तन्खा यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर हे नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पक्षातील अंतर्गत दरी कमी करण्यासाठी सोनिया गांधी या नेत्यांची भेट घेत आहेत.

G-23 नेते संघटनात्मक बदलासाठी जोर देत असल्याचं मानलं जातंय, तर सोनिया गांधी यांनी बैठकीत सांगितलं की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आवश्यक पावलं उचलली जातील. सोनियांचा अहवाला देत सूत्रांनी सांगितलं की, 'पक्षाध्यक्षाची निवडणूक ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. मात्र, तोपर्यंत पक्षात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.' दरम्यान, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमध्ये (उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब) काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT