Congress President Election News Congress President Election News
देश

Congress President Election : २१ ऑगस्टपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक!

काँग्रेस नेत्यांचा एक मोठा वर्ग गांधी कुटुंबाकडेच अध्यक्षपद देण्याच्या तयारीत आहे

सकाळ डिजिटल टीम

Congress President Election News नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशातील सर्वांत जुन्या पक्षाच्या नव्या प्रमुखाची निवड होऊ शकते, असे वृत्त आहे. मात्र, अद्याप खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानिकारक पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (President Election) २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अनेक दिवसांपासून गैर-गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अद्याप यावर एकमत झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मार्चमध्येच सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी २०१७ मध्ये काँग्रेसची (Congress) सूत्रे हाती घेतली. मात्र, तब्बल दोन वर्षांनी त्यांनी हे पद सोडले होते.

काँग्रेस नेत्यांचा एक मोठा वर्ग गांधी कुटुंबाकडेच अध्यक्षपद देण्याच्या तयारीत आहे. गटबाजीने ग्रासलेल्या पक्षावर गांधी घराण्याचा एकत्रित प्रभाव असल्याचे नेत्यांना वाटते, असे सूत्रांनी सांगितले. आणखी एका वृत्तात असेही म्हटले आहे की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT