congress president mallikarjun kharge role in congress win in karnataka assembly election 2023 result  
देश

Mallikarjun Kharge : राहुल गांधी हिरोच! पण काँग्रेस अध्यक्षांना विसरून कसे चालेल?

रोहित कणसे

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. येथे 10 मे रोजी 224 जागांसाठी 2,615 उमेदवारांना 5.13 कोटी मतदारांनी मतदान केले. आज (13 मे रोजी) निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाला 130 हून अधिक जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या विजयात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विसरून चालणार नाहीये.

भाजपला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला मिळवून दिलेल्या या विजयामागे पक्षाच्या 2 दक्षिण भारतीय राजकारण्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. एक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दुसरे काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार.

महत्वाचे म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांची गेल्या वर्षीच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. खर्गे काँग्रेस अध्यक्ष बनल्याने कर्नाटकात पक्षाला संजीवनी मिळाल्याचं पाहायला मिळालं. खर्गे हे 9 वेळा कर्नाटकचे आमदार राहिले असून त्यांचा येथील राजकारणात विशेष प्रभाव आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण पक्षाने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि पक्षाने कर्नाटकात सत्ता काबीज केली आहे. खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसला दुसऱ्या राज्यात सत्ता मिळाली आहे.

येथे खर्गेंमुळे प्रभाव वाढला

कर्नाटक निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून खर्गे यांच्या होमग्राउंडवर काँग्रेसला विजय मिळेल असे म्हटले जात होते. खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे तेथील अनेक समस्या सुटतील, असा युक्तिवाद कर्नाटक काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. पक्षातील गटबाजी संपुष्टात आणण्यासोबतच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवू शकतो,असे म्हटले जात होते. खर्गे हे दीर्घकाळ कर्नाटकच्या राजकारणात सक्रिय राहिले आहेत.

कर्नाटकमधून 9 वेळा आमदार राहिलेत खर्गे

कर्नाटकातील लोकसंख्येपैकी 23% दलित आहेत. राज्यातील 35% जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. खर्गे यांच्यामुळेच या जागांवर काँग्रेसचा प्रभाव वाढला आणि त्यामुळेच येथे सत्ताधारी भाजपचा पराभव झाल्याचे मानले जाते.

कर्नाटकातून नऊ वेळा आमदार राहिलेल्या खर्गे यांचा या भागात बराच दबदबा असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले. मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही, परंतु राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर ते काँग्रेससाठी कर्नाटकातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले. खर्गेंना प्रोजेक्ट करून अनुसूचित जातींचा पाठिंबा मिळवणे काँग्रेसला सोपे गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT