Congress president Mallikarjun Kharge Sonia Gandhi decline the invitation of ram mandir: 
देश

राम मंदिर सोहळ्यासाठी सोनिया गांधी जाणार की नाही? अखेर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

Congress president Mallikarjun Kharge Sonia Gandhi decline the invitation of ram mandir: २२ जानेवारीला अयोध्यतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- २२ जानेवारीला अयोध्यतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी या सर्व कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इव्हेंट ठरवलं आहे. ( Congress president Mallikarjun Kharge Sonia Gandhi decline the invitation of ram mandir ayodhya)

काँग्रेसचे प्रमुख सचिव जयराम रमेश यांनी याबाबत पत्रक जारी केलं आहे. यात सांगण्यात आलंय की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्ष नेते अधीर रंजन चौधरी हे राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारणार नाही. कारण हा पूर्णपणे भाजप आणि आरएसएस यांचे इव्हेंट आहे.

मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांना श्रीराम जन्मभूमी ट्र्स्टने काही दिवसांपूर्वी सोहळ्याचे निमंत्रण पाठवले होते. पण, यावर काँग्रेस नेत्यांकडून कोणतीही भूमिका घेण्यात आली नव्हती. अखेर मंगळवारी काँग्रेसने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करत असल्याचं म्हणत नेत्यांनी जाणं टाळलं आहे.

प्रभू रामाची पूजा देशातील लाखो लोक करतात. धर्म हा खासगी विषय आहे. पण, भाजप आणि आरएसएसने अयोध्येतील राम मंदिराला राजकीय प्रोजेक्ट बनवलं आहे. मंदिराचे काम अपूर्ण असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेते मंदिराचे उद्घाटन करत आहेत. लाखो लोकांच्या भावनांचा आदर करत काँग्रेस नेत्यांनी सोहळ्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काँग्रेसच्या पत्रकार देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासकीय इमारतीला भीषण आग; पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापर झालेल्या ४ हजार ईव्हीएम जळून खाक, काय घडलं?

मधुभाऊ सायलीला सत्य सांगणार; तीच खरी तन्वी असल्याचं उघड होणार; 'ठरलं तर मग' मध्ये मोठा ट्विस्ट, प्रोमो पाहून नेटकरी खुश

अभिनय, क्रिकेट टिमच्या ओनरशिपनंतर प्रीती झिंटा आता दागिन्यांच्या व्यवसायात! लॉन्च केला नवीन लक्झरी ज्वेलरी ब्रँड

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक असतात प्रचंड हसमुख, पण एका चुकीच्या घटनेमुळे बदलून जाते त्यांचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT