congress file photo
देश

काँग्रेसला मुहूर्त मिळेना! अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर

कोविड संकटामुळं झाला निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसजनांना पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी (Congress President) आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण अध्यक्ष निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या (CWC) बैठकीत घेण्यात आला आहे. सध्याच्या कोरोना संकटाच्या (covid outbreak) काळात ही निवडणूक घेणं योग्य ठरणार नाही, असं समितीनं म्हटलं आहे. कार्यकारी समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत ३० जूनपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्याचं ठरलं होतं. (Congress presidential election postponed)

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली होती. यामध्ये सेन्ट्रल इलेक्शन ऑथरिटीनं २३ जून रोजी निवडणुकीची तारीख निश्चित केली होती. मात्र, आता ही निवडणूक पुढे ढकलल्यानंतर पुढील निवडणूक कधी होईल, याबाबत काँग्रेसच्या सेन्ट्रल इलेक्शन ऑथरिटी निर्णय घेणार आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाली. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं की, "पक्षाला निकालाची समीक्षा करायला हवी."

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कार्यकारी समितीत दोन मतप्रवाह आहेत. यांपैकी एका गटानं २३ जून रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा आग्रह धरला होता. तर कोविडची स्थिती पाहता ही निवडणूक घेणे योग्य राहणार नाही, असं एका गटाचं मत होतं. पण दोन्ही गटांची मतं जाणून घेऊन निवडणूक पुढे ढकलण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT