Rahul Gandhi vs Narendra Modi esakal
देश

लक्ष विचलित करण्यासाठी 'यंग इंडिया'चे कार्यालय सील; काँग्रेसचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली :अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील यंग इंडियनचे कार्यालय सील केल्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने याला बेरोजगारी-महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधातील पक्षाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हटले आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यावेळी जी काही कारवाई केली जात आहे, ती काँग्रेसला धमकवण्यासाठी केली जात आहे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की, गेल्या शनिवारी काँग्रेसकडून सर्क्युलर जारी करण्यात आलं. त्यानुसार 5 ऑगस्ट रोजी आम्ही महगाई, बेरोजगारी आणि खाद्य पदार्थांवरील जीएसटीविरुद्ध आंदोलन करण्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आज डीसीपी यांच्याकडून पत्र आले असून 5 तारखेला तुम्ही कोणतही आंदोलन करू शकणार नाहीत. मात्र आम्ही महगाई, बेरोजगारी आणि खाद्य पदार्थांवरील जीएसटी या तीन मुद्यांवर आंदोलन करणारच आहोत. मात्र आता दोन दिवसांपूर्वी एक लेटर येत आणि एआयसीसीला छावणीचं रुप आल्याचं अजय माकन यांनी सांगितलं.

कितीही दडपण आणा, महगाई, बेरोजगारी आणि खाद्य पदार्थांवरील जीएसटीविरोधात आम्ही आंदोलन करणारच आहोत. आमच्यावर दबाव टाकण्यासाठी पोलिसांचा दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून यावेळी करण्यात आला आहे.

दरम्यान भाजपकडून मुद्दे भरकटवण्यासाठी आंदोलनासाठी चुकीचे कारणं देण्यात येत आहेत. काँग्रेस पक्ष दबावात येणार नसून महगाई, बेरोजगारी आणि खाद्य पदार्थांवरील जीएसटीविरोधातील आंदोलन पंतप्रधान निवासापासून सुरू होणार आहे. त्यासाठी भलेही आम्हाला कारागृहात टाका, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT