smruti irani- rahul gandhi
smruti irani- rahul gandhi 
देश

तीन तासांनंतर राहुल गांधी ईडी कार्यलयाबाहेर; स्मृती इराणींचा मोठा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मोठ्या गदारोळात, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी नॅशनल हेराल्डच्या (Nationa Herald) कथित मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले होते. साधारण तीन तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर राहुल गांधी ईडी कार्यालया बाहेर आले आहेत. चौकशीला जाताना राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी वड्रा देखील उपस्थित होत्या. या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेत्या स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत गांधी घराण्याची 2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. (Rahul Gandhi ED News)

स्मृती इराणी म्हणाल्या की, तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित (Congress) राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे लोक उघडपणे एजन्सीवर दबाव आणत आहेत. हे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे का? या प्रकरणावर सखोल माहिती देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, 1930 च्या दशकात असोसिएट जनरल लिमिटेड (AJL) नावाची कंपनी स्थापन झाली, ज्याचे काम वृत्तपत्र प्रकाशित करणे आहे. त्यावेळी त्याचे भागधारक पाच हजार होते. ज्या वृत्तपत्रासाठी स्वातंत्र्यसैनिकांची हमी निश्चित करण्यात आली होती, त्या वृत्तपत्राचा भागभांडवल एका कुटुंबाला देण्यात आला, जेणेकरून ते वृत्तपत्र प्रकाशित करू नये, तर रिअल इस्टेटचा व्यवसाय करावा.

90 कोटींचे कर्ज माफ - स्मृती इराणी

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, 2008 मध्ये या कंपनीने स्वतःवर 90 कोटींचे कर्ज घेतले होते आणि आता ही कंपनी प्रॉपर्टीच्या व्यवसायात उतरणार असल्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये, यंग इंडिया नावाची कंपनी 5 लाख रुपये घेऊन स्थापन झाली, ज्यामध्ये राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. फक्त 75 टक्के हिस्सा त्यांचा होता, बाकीचा हिस्सा त्यांच्या आई सोनिया गांधींसह इतर काही लोकांकडे होता. यानंतर एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले आहेत. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स यंग इंडियाला मिळाले असून 9 कोटींचा हिस्सा आहे. काँग्रेस पक्ष एजेएल कंपनीला 90 कोटींचे कर्ज देते आणि ते नंतर माफ करते हा कोणता प्रकार आहे.

मुंबईत काँग्रेसच्या 250 कार्यकर्ते ताब्यात

दरम्यान, देशभरात ईडी चौकशीदरम्यान राहुल गांधी (Rahul GAndhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या समर्थनार्थ आज मुंबईसह अनेक ठिकाणी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ईडी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी 250 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT