karnataka assembly election result 2023 Esakal
देश

Karnataka Election Result: निकालाआधीच कर्नाटकात मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस पक्षात शर्यत; 'या' दोन दिग्गज नेत्यांमध्ये टक्कर

Karnataka assembly election result 2023: कर्नाटकात शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

Karnataka Election Result 2023:कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. समोर आलेल्या माहितीनुसार आता काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

कर्नाटकात काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. कर्नाटकात काँग्रेस १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. कल सातत्याने बदलताना दिसून दिसून येत आहे. मिळालेल्या आघाडीमुळे कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

याचदरम्यान, कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत सुरू झाली आहे. कर्नाटकात शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. (Latest Political Marathi News)

काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे. यावेळी कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसची निवड केल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हंटलं आहे. अशातच आता काँग्रेस कोणाची मुख्यमंत्री पदासाठी निवड करणार या चर्चेला उधाण आलं आहे.

काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

कर्नाटकात भाजपसह काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेस कंबर कसत आहे. सध्या मतमोजीणी सुरु असून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे.

घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे. नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?

असा सवाल पक्षासह देशभरात उपस्थित होत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी संकटमोचक ठरलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत.

निवडून आलेल्या नेत्यांना आमदारांना एकत्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. तशाच हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत. किंगमेकर असणाऱ्या जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेत्यानी चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत.

तर काँग्रेसचेही काही नेते जेडीएसच्या संपर्कात आहेत. बहुमताचा आकडा सातत्याने बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीला झालाय असाध्य आजार; मुलाने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT