Rahul-Gandhi-Pm-Modi 
देश

पंतप्रधानांची नौटंकी, त्यांच्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट- राहुल गांधी

कार्तिक पुजारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हर्चुअल पद्धतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका करतानाच कामाची पद्धत बदलण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हर्चुअल पद्धतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका करतानाच कामाची पद्धत बदलण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा धोका आम्ही सरकारला वारंवार सांगितला. पण, सरकारने लक्ष दिलं नाही. उलट पहिल्या लाटेनंतर विजय जाहीर केला. कोरोनाला हरवलं म्हटलं. सरकार आणि पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. आजपर्यंत समजला नाही. कोरोना सर्वसामान्य आजार नाही, सतत रुप बदलतोय. जितका वेळ आपण त्याला देऊ तेवढा तो धोकादायक बनत जाईल. कोरोनाला थांबवण्यासाठी काय मार्ग आहे? कोरोना आक्रमण कसं करतो? ज्या लोकांकडे अन्न नाही, कमजोर आहेत त्यांच्यावर विषाणू हल्ला करतो. दुसरीकडे, ज्यांना इतर आजार आहेत त्यांना कोरोनाची लागण होतेय, असं राहुल म्हणाले. (congress rahul gandhi criticze pm narendra modi corona virus)

कोरोना वेगळं रुप धारण करत आहे. विषाणूला रोखण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. पहिला लसीकरणाचा. लसीकरण हाच सर्वात महत्वाचा आणि प्रमुख उपाय आहे. लॉकडाऊन एक हत्यार आहे. पण त्याचा लोकांना त्रास होतो. त्यामुळे लॉकडाऊन लागू केला जाऊ नये. शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. लवकरात लवकरत नागरिकांना लस दिली जात नाही, तर मोठा धोका निर्माण होईल. कारण विषाणू रुप बदलतोय. सरकारने लक्ष नाही दिले, तर अनेक लाटा येत राहतील. सध्या देशातील केवळ 3 टक्के लोकांना लस दिली. तुम्ही कोरोनाला दार बंद केली नाही. ब्राझील देशाने 7 ते 8 टक्के लसीकरण केले. भारत लस निर्माता देश तरी लसीकरण मोठ्या प्रमाणात का झालं नाही, असंही राहुल म्हणाले.

पहिल्या लाटेत काही समजलं नसेल जाऊ द्या, पण दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत, पंतप्रधानांनी नौटंकी केली. लसीकरण झालं नाही तर, तिसरी, चौथी लाट येईल, कारण विषाणू म्युटंट होईल. ज्या प्रकारे काम करत आहात, ते बंद करा, कारण लाखो लोक मरत आहेत. मृत्यूदर चुकीचा आहे. सरकार खोटं पसरवत आहे. जनतेला सत्य सांगा. मी राजकारण करत नाहीये, हा देशाचा भविष्याचा प्रश्न आहे. आम्ही शत्रू नाही, आम्ही मार्ग दाखवतो आहोत, आमचं ऐकलं असतं तर लाखो लोक मेले नसते, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT