political esakal
देश

देशाला ठोस योजनांची गरज पण पंतप्रधान फक्त गाजर दाखवतात - राहुल गांधी

सध्या देशात पहायला गेलं तर कृतीची आवश्यकता आहे, मात्र ...

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात पहायला गेलं तर कृतीची आवश्यकता आहे, मात्र ...

देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरु आहेत. टप्प्यांमध्ये चालु असणाऱ्या या विधानसभा निवडणुकींसाठी त्या त्या राज्यांत रीघ लागली आहे. याकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'मन की बात' मार्फत देशवासीयांशी संवाद साधला आहे. यावेळी 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर बोलताना त्यांनी भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचं आवाहन केलं आहे. आता त्यांच्या या विधानामुळं विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये ते म्हणतात, सध्या देशात पहायला गेलं तर कृतीची आवश्यकता आहे, मात्र या सगळ्याकडे कानाडोळा करत देशाचे पंतप्रधान मात्र सर्वांचे लक्ष विचलीत करण्यावर भर देत आहेत. आपल्या देशाला ठोस योजनांची गरज आहे पण पंतप्रधान केवळ गाजर दाखवतात. पंतप्रधान मोदी यांनी आज पार झालेल्या मन की बात या कार्यक्रमात केलेल्या आवाहनाला अनुसरुन त्यांनी हा टोला लगावला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये टांझानियाचे (Tanzania) किली पॉल आणि नीमा पॉल या भावंडांचं उदाहरण देत, या भावंडांप्रमाणेच मी प्रत्येकाला, विशेषत: वेगवेगळ्या राज्यांतील मुलांना लोकप्रिय गाण्यांचे लिप-सिंकिंग (Lip-syncing) व्हिडिओ बनवण्याचे आवाहन करतो, असं म्हटलं आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' संकल्पनेतून भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT