Randeep Surjewala Reaction Rajiv Gandhi's Assassination Convict Released esakal
देश

राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या सुटकेनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या (Rajiv Gandhi's Assassination Convict Released) करणाऱ्या आरोपीची न्यायालयाने सुटका केली आहे. त्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मोदी सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की न्यायालयाला असा आदेश द्यावा लागला, असा आरोप काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

''दहशतवादाबाबत सरकारचा हा दृष्टिकोन निषेधार्ह आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. यामुळे कोट्यवधी भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कारण न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका केली आहे. त्याला मोदी सरकार जबाबदार आहे. 9 सप्टेंबर 2018 रोजी तामिळनाडूच्या तत्कालीन AIADMK-भाजप सरकारने तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना राजीव गांधींच्या हत्येतील सातही दोषींची सुटका करण्याची शिफारस पाठवली होती. राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. पण, त्यांनीही कुठलाही निर्णय घेतला नाही. भाजप सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयामुळे एका मारेकर्‍याची सुटका झाल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला. आता सर्व दोषींची सुटका होईल'', असंही ते म्हणाले.

'मोदीजी, हाच तुमचा राष्ट्रवाद आहे का? कुठलाही निर्णय न घेता न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सोडावे ही तुमची पद्धत आहे का? ज्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे, त्या आधारावर हजारो तामिळ कैद्यांची सुटका झाली पाहिजे. देशात जन्मठेपेची शिक्षा झालेले लाखो कैदी आहेत, त्यांचीही सुटका झाली पाहिजे, असंही सुरजेवाला म्हणाले. राजीव गांधी फक्त काँग्रेसचे नव्हते. ते देशाची पंतप्रधान होते आणि त्यांनी देशासाठी बलिदान दिले होते. सरकारची भूमिका निषेधार्ह असून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. या सरकारचा दहशतवादाबाबत काय दृष्टीकोण आहे? हे देशातील जनतेने पाहावे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. जर दहशतवाद आणि पंतप्रधानांच्या हत्येतील दोषींना अशा प्रकारे सोडले जाणार असेल तर या देशातील कायद्याची अखंडता कोण राखणार? असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT