PM Modi’s big Statement on National
esakal
Congress maybe Faces Internal Rift After Bihar’s Major Defeat : बिहार विधानसभा निवडणुकी भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीने प्रचंड बहुमत मिळवत विजय मिळवला आहे. तर महाआघाडीचा दारूण पराभव झाला आहे. बिहारमध्ये जागा जिंकण्याच्या बाबतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसच पूर्ण पानीपत झालय. भाजपच्या या ऐतिहासिक विजयानिमित्त दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित जल्लोषाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी आता एक मोठं विधान केलं, ज्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ''काँग्रेसकडे देशासाठी कोणतही पॉझिटिव्ह व्हिजन नाही. वस्तूस्थिती ही आहे, की आज काँग्रेस आणि मी हे अतिशय गांभीर्याने सांगतोय, आज काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे एमएमसी बनली आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा आता यावरच चालतोय.
तसेच ''हे जे काँग्रेसचे नामदार आहेत, ज्या रस्त्यावर काँग्रेस नेत आहेत, त्यांच्याप्रती अतिशय निराशा, नाराजी आतल्याआतच वाढत आहे. मला तर शंका आहे, होवू शकतं, की भविष्यात काँग्रेसचं आणखी एक मोठं विभाजन होईल.'' असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.
याशिवाय, ''काँग्रेसचे जे मित्रपक्ष आहेत, तेही समजत आहेत की काँग्रेस आपल्या निगेटीव्ह पॉलिटिक्समध्ये सर्वांना एकत्रितपणे बुडवत आहे. मी याआधीही काँग्रेसच्या सहकाऱ्यांना इशारा दिला होता की, काँग्रेस एक लायबिलिटी आहे, काँग्रेस एक अशी परजीवी आहे. जी आपल्या सहकाऱ्यांची व्होटबँक गिळंकृत करून आपली वापसी करू इच्छित आहे. यामुळेच काँग्रेसपासून सावधान राहण्याची आवश्यकता, त्यांच्या सहकाऱ्यांना देखील आहे.'' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.