Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना? भाजपने घेतली आक्रमक भूमिका

व्हिडीओ डीलीट करुन महाराष्ट्राची माफी मागा, भाजपची मागणी

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील गाणं लावण्यात आलं आहे. या व्हिडीओतून राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

काँग्रेसककडून ट्विट केलेल्या या व्हिडिओवर भाजपने आक्षेप घेत व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. व्हिडिओ डिलीट करून काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी असंही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवरुन महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसने महाराष्ट्र आणि देशाची माफी मागावी, अशी माागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायी आहे. हा व्हिडीओ डिलीट करा आणि माफी मागा. जर व्हिडिओ डिलीट केला नाही तर आंदोलन करण्यात येईल असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

राहुल गांधींच्या व्हिडीओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत - नाना पटोले

राहुल गांधींच्या व्हिडीओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी भाजपला दिलं आहे. कोश्यारींनी शिवरायांचा अपमान केला तेव्हा भाजप का गप्प होती? भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपनं नाहक आरोप करणं बंद करावं. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२-१२ तास काम करूनही बोलायला ३ मिनिटंच देताय; भडकलेले खासदार सभापतींना म्हणाले, तुम्ही १ दिवसाचे मुख्यमंत्री होतात...

Infosys News: फ्रान्सने इन्फोसिसवर ठोठावला 2 कोटींचा दंड! कामाच्या तासांमुळे कंपनी अडचणीत; नेमकं काय घडलं?

Anna Bhau Sathe Jayanti : आता शाळा, महाविद्यालयांमध्ये होणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव; 1 ऑगस्ट 'लेखन प्रेरणा दिन' जाहीर, शासनाकडून शिक्कामोर्तब!

Live Marathi News Update : सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६ लोकसभेत मंजूर

Monsoon Hydration Tips: पावसाळ्यात शरीर योग्य प्रकारे हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पाणी पिणं का पुरेसं नसतं? का पडते इलेक्ट्रोलाइट्सची गरज

SCROLL FOR NEXT