prashant kishor
prashant kishor 
देश

काँग्रेसचा 'हाथ' प्रशांत किशोर के साथ?; बैठकीत होणार निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांड आज महत्त्वाची बैठक होत असून, या बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चा केली जाणार आहे. प्रशांत किशोर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करणार की नाही याबाबतही शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह किशोर यांच्या प्रस्तावावर आहवाल सादर करणाऱ्या सात सदस्यीय समितीचे सदस्यही सहभागी झाले आहेत. (Congress Prashant Kishor Meeting)

दरम्यान, या बैठकीपूर्वी काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये तीन बैठका पार पडल्या असून, यामध्ये किशोर यांनी पक्षाला गेल्या काही वर्षांतील निवडणुकांमधील पराभवांवर मंथन करण्याबरोबरच पक्षाला पुनरुज्जीवित करण्याच्या योजनेबाबत सादरीकरण केले होते. परंतु, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला टक्कर देणार्‍या पक्षांशी किशोर यांचे संबंध असल्यामुळे काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा एक गट किशोर यांच्या सोबत जाण्यास सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रशांत किशोर यांच्याशी हात मिळवणी करणार की वेगळ्या मार्गाचा अवलंब करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

बैठकीसाठी पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अंबिका सोनी, जयराम रमेश, दिग्विजय सिंग आणि रणदीप सिंग यांच्यासह काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, एके अँटनी 10 जनपथ येथे दाखल झाले आहेत.

काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काय आहे प्रशांत किशोर यांचा प्लॅन?

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेस २.० नुसार, सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष, तसेच गांधी कुटुंबाशिवाय कार्याध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आणि राहुल गांधींना संसदीय मंडळाचे प्रमुख बनवावे, असं सुचविण्यात आलं आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या निर्देशानुसार तळागाळात पोहोचून काम करणारे बिगर गांधी कार्याध्यक्ष पाहिजे, असं या अहवालात म्हटलं आहे. तसेच पक्षातील अंतर्गत वाद सोडवणे, तळागाळातील नेत्यांची पुनर्बांधणी करणे, माध्यमे आणि डिजिटल प्रचाराचे समर्थन करणे या सर्व गोष्टी प्रशांत किशोर यांनी सूचविल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT