Congress write letter to Mark Zuckerberg on Facebook-BJP alliance issue Rahul Gandhi.jpg 
देश

'फेसबुक-भाजप' युतीप्रकरणी काँग्रेसचे मार्क झुकरबर्गला पत्र

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- समाज माध्यमातील प्रसिद्ध कंपनी फेसबुक (Facebook) आणि भाजप यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र वॉल स्ट्रिट जर्नलने (Wall Street Journal) केला होता. यामुळे भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने फेसबुक कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना ईमेल करुन एक पत्र लिहिले आहे. यामध्ये कंपनीने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मागणी काँग्रेसने केली आहे.

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णवाढ घटली; संपूर्ण परिस्थितीची माहिती...

भाजप आणि फेसबुक यांची युती असल्याच्या बातमीची उच्च स्तरीय चौकशी केली जावी. तसेत चौकशी पूर्ण होईपर्यंत इंडियातील फेसबुकचे संचालक मंडळ बदलले जावे, जेणेकरुन चौकशी प्रभावित होणार नाही. काँग्रेसने संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांच्या नावाने मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहिले आहे. 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. भारतीय नागरिकांनी या प्रकरणी प्रश्व विचारायला हवेत, असं ते म्हणाले आहेत. आपण पक्षपात, फेक न्यूज आणि हेट स्पीचद्ववारे अथक प्रयत्नांनी मिळवेल्या लोकशाहीसोबत छेडछाड सहन करु शकत नाहीत. समाज माध्यमावर फेक न्यूज आणि हेट स्पीचप्रकरणी फेसबुकच्या भूमिकेला वॉल स्ट्रिट जर्नल उजेडात आणले आहे. त्यामुळे भारतीयांनी या प्रकरणी प्रश्न विचारायला हवेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.  

केसी वेणुगोपाल यांनी झुकरबर्ग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, काँग्रेस या प्रकरणामुळे खूप निराश झाला आहे. फेसबुक मुख्यालयाकडून या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जावी आणि एक ते दोन महिन्यांमध्ये ही चौकशी पूर्ण व्हावी. तसेच यासंबंधी रिपोर्टला सार्वजनिक केले जावे. शिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत भारतातील फेसबुक अधिकाऱ्यांच्या जागी नवीन टीम नेमली जावी. जेणेकरुन चौकशी प्रभावित होणार नाहीत.

दरम्यान, अमेरिकी वृत्तपत्र ‘Wall Street Journal'ने शुक्रवारी एका रिपोर्ट जाहीर केला होता. यामध्ये फेसबुक आणि भाजपची युती असल्याचं सांगण्यात आलं होतं. भाजप नेत्यांच्या काही आक्षेपार्ह पोस्टवर फेसबुकने जाणूनबुजून दुर्लक्ष केले, असा दावा काही अनामिक सूत्रांकडून वॉल स्ट्रिट जर्नलने  केला होता. फेसबुक कंपनीच्या प्रवक्त्याने समूहाची भूमिका मांडत या आरोप-प्रत्यारोपांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा ऑनलाइन प्लॅटफार्म हा चिथावणीखोर भाषणे आणि हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराला नेहमीच प्रतिबंध करतो, असे कंपनीकडून सांगण्यात आले. आमचे धोरण हे जगभरामध्ये सर्वत्र सारखेच आहे, याची अंमलबजावणी करताना कुणाची राजकीय पत किंवा संबंधित व्यक्ती कोणत्या पक्षाशी संलग्न आहे, याचा विचार केला जात नाही, असे या प्रवक्त्याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT