Conrad Sangma takes oath as Meghalaya CM
Conrad Sangma takes oath as Meghalaya CM esakal
देश

Meghalaya CM Oath : PM मोदींच्या हजेरीत संगमांनी घेतली सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

सकाळ डिजिटल टीम

मेघालय व्यतिरिक्त पीएम मोदी त्रिपुरा आणि नागालँडमध्येही शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

शिलाँग : नॅशनल पीपल्स पार्टीचे (NPP) अध्यक्ष कॉनराड संगमा (Conrad Sangma) यांनी मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीये. यासह संगमा सलग दुसऱ्यांदा मेघालयचे मुख्यमंत्री (CM Meghalaya) बनले आहेत.

कॉनराड संगमा यांच्या व्यतिरिक्त प्रेस्टन टायन्सॉंग आणि स्नियावभालंग धर यांनी मेघालयचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मेघालय सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित आहेत.

एनपीपीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं मेघालयमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. भाजपच्या दोन आमदारांसह 45 आमदार युतीला पाठिंबा देत आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून ईशान्येच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.

मेघालय व्यतिरिक्त पीएम मोदी त्रिपुरा आणि नागालँडमध्येही शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यासोबतच आसाम मंत्रिमंडळाच्या सदस्यांसोबत बंद खोलीत बैठकही होणार आहे.

शिलाँगमध्ये शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी कोहिमाला रवाना होतील आणि नागालँडच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. नागालँडमध्ये NDPP आणि भाजप युतीनं 60 पैकी 37 जागा जिंकल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT