constitution of india google
देश

'भारतीय संविधानाची ओळख' हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य

'भारतीय संविधानाची ओळख' हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय काल झालेल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नमिता धुरी

मुंबई : १४ एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'भारतीय संविधानाची ओळख' हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय काल झालेल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

आज १४ एप्रिल ही डॉ. आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचे कार्य त्यांनी संविधान लेखनामध्ये दिलेले योगदान यांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून 'भारतीय संविधानाची ओळख' हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे तरूण विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांची ओळख होऊ शकेल.

अशाचप्रकारचा उपक्रम शालेय शिक्षण विभागानेही राबवला आहे. देशातील घराघरांत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत संविधान (Constitution in Every household) पोहोचले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांचे आचार, विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य शिक्षक करू शकतात. याच जाणीवेतून संविधान प्रत वितरित करण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यभर राबवण्यात येत आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रम घेऊन लिहिलेली भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. आपल्या न्याय्य हक्कांची, संवैधानिक अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी यासाठी भारताचे संविधान सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणूनच शिक्षण संस्थांच्या माध्यमातून या संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

IPL Mock Auction: भारतीय फिरकीपटूंना मोठी मागणी, 'हा' खेळाडू ठरला सर्वात महागडा; पाहा टॉप-५ लिस्ट

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT