Construction of Qutub Minar to see the changing direction of the sun Construction of Qutub Minar to see the changing direction of the sun
देश

कुतुब मीनार म्हणजे सन टॉवर; राजा विक्रमादित्यांनी बांधल्याचा दावा

सकाळ डिजिटल टीम

सूर्याची (sun) बदलती दिशा पाहता यावी म्हणून कुतुब मीनार (Qutub Minar) पाचव्या शतकात राजा विक्रमादित्य यांनी बांधले. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करू शकतो, असा दावा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या (ASI) माजी प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा यांनी केला आहे. मथुरेतील ज्ञानवापी मशीद ते ईदगाह, दिल्लीतील जामा मशीद हे पहिले मंदिर असल्याची चर्चा असताना आणि वेगवेगळ्या न्यायालयात याचिका दाखल झाल्या असताना हा दावा करण्यात आला आहे. (Construction of Qutub Minar to see the changing direction of the sun)

कुतुब मीनार (Qutub Minar) हे कुतुब-अल-दीन ऐबकने बांधले नव्हते तर राजा विक्रमादित्य यांनी बांधले होते. सूर्याच्या दिशेचा अभ्यास करण्यासाठी कुतुब मीनार याचे बांधकाम करण्यात आले होते. हा कुतुब मीनार नाही तर सन (sun) टॉवर (वेधशाळा टॉवर) आहे. हे राजा विक्रमादित्य यांनी पाच व्या शतकात बांधले होते. माझ्याकडे याबाबत बरेच पुरावे आहेत, असा दावा धरमवीर शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी एएसआयच्या वतीने कुतुब मीनारचे अनेकदा सर्वेक्षण केले आहे.

कुतुब मीनार (Qutub Minar) २५ इंच वाकलेला आहे. कारण, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. २१ जून रोजी किमान अर्धा तास तरी तिथे सावली राहत नाही. हे विज्ञान आणि पुरातत्त्व तथ्य आहे. कुतुब मीनार ही एक वेगळी रचना आहे आणि त्याचा जवळच्या मशिदीशी कोणताही संबंध नाही. कुतुब मीनारचा दरवाजा उत्तर दिशेला आहे. जो रात्रीच्या वेळी ध्रुव तारा पाहण्यासाठी बनवला गेला होता, असेही धरमवीर शर्मा म्हणाले.

कुतुब मीनारचे नाव बदलण्याची मागणी

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कुतुब मीनार (Qutub Minar) परिसरात हिंदू संघटनांनी आंदोलन केले होते. कुतुब मीनारचे नाव बदलावे, अशी या संघटनांची मागणी आहे. कुतुब मीनारचे नाव बदलून विष्णू स्तंभ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. कुतुब मीनार हा आधीचा विष्णू स्तंभ आहे. तसेच जैन आणि हिंदू मंदिरे तोडून कुतुब मीनार बांधण्यात आले, असा दावा या संघटनेने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT