BJP leader KS Eshwarappa esakal
देश

कंत्राटदार आत्महत्या प्रकरण : भाजपच्या माजी मंत्र्याला क्लीन चिट

ईश्वरप्पा यांच्याकडं मंत्री म्हणून पंचायत राज खात्याची जबाबदारी होती.

सकाळ डिजिटल टीम

ईश्वरप्पा यांच्याकडं मंत्री म्हणून पंचायत राज खात्याची जबाबदारी होती.

बंगळुरु : कर्नाटकचे (Karnataka) माजी मंत्री आणि भाजप नेते केएस ईश्वरप्पा (BJP leader KS Eshwarappa) यांना मोठा दिलासा मिळालाय. कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी ईश्वरप्पांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. या प्रकरणामुळं त्यांना मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावं लागलं होतं. कारण, ठेकेदारानं व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये केएस ईश्वरप्पा यांना मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं.

या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) 12 एप्रिल रोजी संतोष पाटील (Santosh Patil) यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, पण फारसा पुरावा सापडला नाही. आता या प्रकरणात पुराव्याअभावी माजी मंत्री निर्दोष सुटले आहेत. याबाबत उडुपी पोलिसांनी (Udupi Police) न्यायालयात अहवालही दाखल केलाय.

ईश्वरप्पा यांच्याकडं मंत्री म्हणून पंचायत राज खात्याची जबाबदारी होती. आत्महत्या केलेल्या संतोष पाटील या कंत्राटदारानं आरडीपीआर विभागात काम केल्याचं आपल्या आरोपात म्हटलं होतं. ते काम 4 कोटींचं होतं. मात्र, त्यांना मोबदला मिळाला नाही. पाटील यांनी आधी पत्नीचं दागिनं विकून कर्ज फेडलं, मात्र 4 कोटींच्या कामासाठी मंत्री 40 टक्के कमिशन मागत होते. कोणताही मार्ग शिल्लक नसताना त्यांनी हे पाऊल उचललं. त्यानंतर त्यांचा मृतदेह उडुपीतील एका खासगी लॉजमध्ये सापडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT