Ram nath Kovind vs Udit Raj esakal
देश

जात पाहून खुश होऊ नका, कोविंद राष्ट्रपती झाले, पण..; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

देशाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळणार आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे.

नवी दिल्ली : देशाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळणार आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential Election) होणार असून, त्याबाबत राजकीय हालचाली सुरू आहेत. झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना एनडीएकडून (NDA) उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलंय, तर विरोधकांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.

दरम्यान, आता काँग्रेस नेते उदित राज (Congress leader Udit Raj) यांनी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदित राज यांनी प्रस्तावित राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान वादग्रस्त ट्विट केलं असून, त्यानंतर ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत. काँग्रेस नेत्यानं विद्यमान राष्ट्रपती कोविंद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करताना त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'जात पाहून आनंदी होऊ नका. कोविंदजी राष्ट्रपती झाले, तेव्हा दलित आनंदी होते, असं त्यांनी नमूद केलं.

त्यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलंय, जेव्हा झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, ज्या ओरिसाच्या आहेत आणि आदिवासी समाजाशी संबंधित आहेत. त्यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आलीय. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या, तर आदिवासी समाजातून आलेल्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील. उदित राज यांनी असं वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. अनेकदा ते वादग्रस्त वक्तव्य करत असतात. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महान नाटककार म्हणून वर्णन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT