Narendra Modi-HD Deve Gowda esakal
देश

'या दोन पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळं देशाचं मोठं नुकसान झालंय'

सकाळ डिजिटल टीम

'या' दोन पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळं देशाचं मोठं नुकसान झालंय.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर निर्माण झालेल्या वादावर आता माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (Former PM HD Deve Gowda) यांचं ट्विट समोर आलंय. देवेगौडांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून झालेला वाद दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. जेव्हा भारताच्या 'सर्वोच्च' सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत आत्मसंतुष्ट राहू नये. भूतकाळातील घटनांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी लिहिलंय की, आपल्याला भूतकाळातून शिकण्याची गरज आहे.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल पंजाब (Punjab) दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणारं होतं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (CM CharanjitSingh Channi) हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. पंतप्रधान मोदी यांचा ताफ्या ज्या मार्गावरुन जाणार होतो. त्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक असल्याचं दिसून आलं. त्यामुळं पंतप्रधान मोदी सुमारे 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून होते. त्यानंतर मोदी यांनी आपला पंजाब दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर या सर्व घडामोडीनंतर पंतप्रधानांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं वृत्त एएनआयनं दिलंय.

पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार असतो, तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळं मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर (Bhatinda Airport) जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा ताफा ज्या भागात थांबला होता, तो भाग हेरॉईन तस्करांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच भागात दहशतवादी घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT