देश

कोरोना वाढतोय, गाफील राहू नका; केंद्राचे राज्यांना पुन्हा पत्र

साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांचा उद्देशून पत्र लिहिले आहे. यात त्यांनी वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत गाफील राहू नये अशा सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये आणि परिस्थिती हलक्यात घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, जसे आपण आत्तापर्यंत करत आलो आहोत असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे. (Rajesh Bhushan Letter To All State After Hike In Corona Cases)

महाराष्ट्रात संसर्गाचा वेग अधिक

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला असून येथे कोरोना संसर्गाचा वेग अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,813 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाणही झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे सर्वाधिक सक्रीय रूग्णांची नोंद मुंबई आणि त्यापाठोपाठ ठाण्यात करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1702 नवीन रुग्ण आढळले आहेत.

तर, दुसरीकडे देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7240 नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशात 5233 नवे रुग्ण आढळले होते. याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 3741 नवे बाधित आढळले होते. त्यानंतर देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी 94 दिवसांनंतर देशातील नवीन बाधितांची संख्या 5000 च्या पुढे गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

Shikhar Shingnapur: शिखर शिंगणापूरच्या कळसाला मानाचा ध्वज; ‘हर हर महादेव’चा जयघोष, मध्यरात्री शिवपार्वती विवाह, काय आहे पारंपरिक प्रथा?

Quick and Healthy Breakfast: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल! झटपट बनवा प्रोटीनने भरपूर 'मसूर कटलेट्स'; हेल्दी आणि चवदार नाश्ता

SCROLL FOR NEXT