राज्यात 24 तासांत कोरोना बाधितांचा उच्चांक; चिंतेत भर

corona update
corona update

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत नव्या कोरोना (Corona) बाधितांच्या आकडेवारीने उच्चांकी नोंद केली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात नव्या 2, 813 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अडीच हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे. त्यात आज या आकडेवारीने नवा टप्पा पार केला आहे. 2,813 नव्या रुग्णांपैकी 1,702 रूग्ण एकट्या मुंबईतील असल्याने येथील नागरिकांचीदेखील चिंता वाढली आहे. (Maharashtra Corona Update)

corona update
देशात कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ; 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद

दरम्यान, राज्यात चोवीस तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.98 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे. तर, राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 11, 571 इतक्या कोरानाच्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, मुंबईमध्ये सर्वाधिक 7,998 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ठाण्यात 1,984 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com