Corona Update 
देश

Corona Update: देशात गेल्या 24 तासात 750 जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू; जेएन.1 व्हेरियंटचे 23 रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात असून तेथे ५६३ रुग्ण आहेत आणि दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २९७ जण बरे झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नव्या जेएन.१ मुळे आरेाग्य यंत्रणा कामाला लागलेली असताना गेल्या चोवीस तासांत देशभरात कोरोनाचे नवे ७५२ रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या सात महिन्यातला सर्वाधिक आहे. त्यापैकी ३५२ जण बरे झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या चोवीस तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४२० असून काल ही संख्या २ हजार ९९८ होती. जेएन.१ ची आतापर्यंत २३ जणांना लागण झाली आहे.

देशभरात आतपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४.५ कोटींवर पोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात असून तेथे ५६३ रुग्ण आहेत आणि दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २९७ जण बरे झाले आहेत.

तसेच राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. १९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या काळात ८ लाख ५० हजार रुग्णांची नोंद झाली आणि तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात मृत्युदर ८ टक्क्यांनी कमी झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन.१ हा आतापर्यंत ४१ देशांत पसरला आहे. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा, स्वीडन येथे जेएन.१ चे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात २२ डिसेंबरपर्यंत या नव्या संसर्गाचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र त्यांच्यात किरकोळ लक्षणे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. (Latest Marathi News)

या प्रकारामुळे लोकांना अधिक धोका नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. सध्याची लस जेएन.१ प्रकारावर परिणामकारक उपचार करणारी आहे, असे म्हटले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने खबरदारी घेण्याचे आणि काळजी घेण्याची सूचना केली आहे. गर्दीच्या ठिकाणी, बंद खोलीत किंवा दूषित वातावरणात मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची देखील सूचना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT