Pm Modi Corona
Pm Modi Corona 
देश

कोरोना परिस्थिती चिंताजनक; PM मोदी 8 एप्रिलला घेणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आज मंगळवारी एक बैठक घेतली. यामध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत ही बैठक पार पडली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबत आणि लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी बातचित करतील. आज देशात एक लाखाहून अधिक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण संक्रमितांचा आकडा सव्व कोटीच्या वर गेला आहे. 

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, ऍक्टीव्ह रुग्णांच्या संख्या गतीने वाढत आहे. आणि सध्या ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या सुमारे सात लाखांच्या पार आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संक्रमणाची 1,03,764 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 477 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 52,825 लोक बरे झाले आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सापडलेल्या एक लाखाहून अधिक रुग्णांमधील 81 टक्के संक्रमित रुग्ण फक्त 8 राज्यांमधील आहेत. सोमवारी देशात जेवढे रुग्ण सापडले आहेत त्यातील रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तमीळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाबमधलेच 81.90 टक्के आहेत. म्हणजे जवळपास 18.10 टक्के प्रकरणे देशातील या आठ राज्यांच्या बाहेरचे आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण 57,074 सापडले आहेत. जे देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 55.11 टक्के आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT