Coronavirus in India esakal
देश

धोका वाढला! देशात 24 तासांत आढळले 20,038 नवे रुग्ण; 47 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचे (Coronavirus in India) रुग्ण सातत्यानं वाढत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोनाचे (Coronavirus in India) रुग्ण सातत्यानं वाढत आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Coronavirus in India) रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,038 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 16,994 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.

त्याचवेळी गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 47 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचं झाल्यास, ही संख्या 1,39,073 आहे तर सकारात्मकतेचा दर 4.44% टक्क्यांवर पोहोचला आहे. काल (गुरुवार) देशात कोरोनाचे 20139 नवीन रुग्ण आढळले होते, तर 38 जणांचा मृत्यू झाला होता.

राज्यात गुरूवारी 2229 नव्या रुग्णांची भर

मुंबई : राज्यात काल (गुरुवार) 2229 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात एकूण 2594 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या 3318 सक्रिय रुग्ण (Active Patient) आहेत. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 47, 894 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.95 टक्के इतकं झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT