corona updates corona updates
देश

Corona Updates: चिंता वाढली! दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ

भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

रुपेश नामदास

भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवार (13 मार्च) देशात कोरोनाच्या 192 रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता 3809 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहिती नुलार केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, आत्ता पर्यंत एकूण मृतांची संख्या 5,30,782 झाली आहे. संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 4.46 कोटी (4,46,90,492) झाली आहे. तर आत्ता पर्यंत 98.80 टक्के लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 44156345 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचा दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने शनिवारी काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात हळूहळू वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

भारतात देखील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निती आयोगाचे आवाहन

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन निती आयोगाच्या वतीने करण्यात आलं आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.

या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT