United-Nations 
देश

भोजन योजनेला कोरोनाचा फटका; संयुक्त राष्ट्रांकडून चिंता

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - जगभरातील अनेक देशांमध्ये गरीब वर्गातील शालेय मुलांना भोजन देण्याच्या मोहीमांनाही कोरोना संसर्गाचा फटका बसला असून संयुक्त राष्ट्राने त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विविध देशांतील दानशूर व श्रीमंतांचे सहकार्य घेऊन शालेय भोजन कार्यक्रमांची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, भारतात यावर्षी विक्रमी गहू उत्पादन होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली असल्याच्या पाशर्वभूमीवर भारतातील शालेय आहार योजनांबाबत आशादायक चित्र असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात विविध राज्यांत माध्यान्ह भोजन योजना व केंद्राच्या सर्व शिक्षा कार्यक्रमांतर्गत आदिवासी व दुर्गम भागांत शालेय आहार योजना राबविण्यात येतात. मागील वर्षी जगालाच कोरोना संसर्गाचा फटका बसला व त्याचा थेट परिणाम अविकसित व विकसनशील देशांतील शालेय भोजन योजनांना बसला आहे.

अनेक शाळांमध्ये मुलांना मिळणाऱ्या भोजनाला मुकावं लागत असून या मोहिमेचा वेग मंदावला असल्याबद्दल या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनापूर्वी म्हणजे २०२० च्या सुरवातीपर्यंत या कार्यक्रमाअंतर्गत जगातील १९९ देशांत किमान ३७ कोटी मुलांना शाळांमार्फत मोफत पोषण आहार पुरवला जात होता. मात्र, कोरोना काळात अनेक देशांत शाळाच बंद झाल्याने ही मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. 

ही परिस्थिती बदलण्यासाठी मुख्यतः विकसित देशांचे सहकार्य घेऊन या अन्न कार्यक्रमांची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे.  या पार्श्‍वभूमीवर यूनोसाठी भारताबाबत एक आशादायक चित्र दिसत आहे. कोरोना अनलॉकनंतर जसजशा राज्यांत शाळा सुरू होत गेल्या तेथे माध्यान्ह भोजन योजनाही बहुतांश प्रमाणात सुरू झाल्या आहेत. केंद्राने एमएसपीअंतर्गत यंदा विक्रमी धान्यखरेदी केल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केल्याने भारतातील शालेय आहार योजनांना कोरोनाचा फटका बसण्याची शक्‍यता कमी असल्याची आशा व्यक्त होत आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण मिळालं तरी कसं? बघा संपुर्ण इतिहास

पत्राच्या घरापासून सुरुवात; आज हक्काच्या घरात गृहप्रवेश, पण सुख पाहायला बहीण नाही, लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची पोस्ट चर्चेत

Leopard Attack: दूध घालून परतताना उसातून बिबट्याची झेप! दुचाकीस्वार शेतकऱ्याने हल्ला चुकवत वाचवला जीव, बिबट्याच्या हल्ल्याने थरकाप..

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT