corona outbreak alert in india cases may increase rapidly in january next 40 days crucial for india  
देश

Corona Outbreak : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी पुढचे ४० दिवस महत्त्वाचे; जानेवारीत रुग्णसंख्येचा स्फोट?

सकाळ डिजिटल टीम

corona outbreak alert in india : भारतासह जगभरात कोरोनाचा धोका असतानाच एक मोठी माहिती समोर येत आहे. जानेवारीमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू शकतात असा दावा केला जात आहे. यामुळे भारतासाठी पुढील 40 दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत. अधिकृत सूत्रांनी महामारीच्या प्रसाराच्या पूर्वीच्या वेगाचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

यापूर्वीही असेच घडले होते

आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पूर्व आशियाला कोरोनाचा तडाखा बसल्यानंतर 30-35 दिवसांनी भारतात साथीची नवीन लाट आल्याचे यापूर्वीही आढळून आले होते. हा एक ट्रेंड यापूर्वी देखील दिसून आला आहे. मात्र, संसर्गाची तीव्रता कमी असल्याचेही त्यात म्हटले आहे. कोरोनाची लाट आली तरी मृतांचा आकडा आणि बाधित रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी असेल.

चीनसह अनेक देशांमध्ये परिस्थिती बिकट

देशात कोरोनाचा धोका वाढत असतानाच चीन आणि दक्षिण कोरियासह काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार सतर्क झाले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे.

BF.7 रुग्णांमध्ये वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णसंख्येत वाढ रोखण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक देखील घेतली. कोरोनाच्या ओमिक्रॉन सबव्हेरिएंट बीएफ.7 मुळे झाली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की BF.7 च्या प्रसाराचे प्रमाण खूप जास्त आहे आणि एक संक्रमित व्यक्ती 16 लोकांना संक्रमित करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT