Corona Pandemic Sakal
देश

महामारीचा अंत जवळ आलाय, लॅन्सेटच्या अहवालातून समोर आली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या (India Corona Cases) वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाचे संक्रमण चालूच राहील. पण महामारीचा (Corona Pandemic) अंत जवळ आला आहे, असं द लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

सध्या ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉनची लाट गेल्यानंतर देखील कोरोना होईल. पण, महामारी येणार नाही. कोरोना सर्दी-खोकल्यासारखा वारंवार होणार आजार असेल. पण, त्याला आवर घालण्यासाठी आरोग्य यंत्रणांना योग्य ते व्यवस्थापन करावे लागेल. सरकारने कोरोनाला आवर घालण्यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय केले होते. ते आता करावे लागणार नाहीत, असंही लॅन्सेट अहवालामध्ये म्हटलं आहे.

कोरोना विषाणूचं संक्रमण सुरूच राहील. तसेच लसीकरणामुळे मिळालेली रोगप्रतिकारशक्ती कमी होताच कोरोनाचा होण्याचा धोका असेल. देशात हिवाळ्यात सर्वाधिक संक्रमणाची शक्यता आहे. पण, विषाणूचा प्रभाव कमी असेल. कोरोना लसी, आधीच अनेक लोकांना होऊन गेलेला संसर्ग यामुळे कोरोनाचे आरोग्यवर कमी परिणाम होतील. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण कोरोनाच्या येणाऱ्या लाटांमध्ये संरक्षण करू शकतो, असंही या अहवालामध्ये म्हटलं आहे.

काही देशांमध्ये अद्याप ओमिक्रॉनची लाट आलेली नाही. अशा देशांमध्ये देखील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढून लवकरच पीक येण्याची शक्यता आहे. त्याला आवर घालण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. तसेच ओमिक्रॉन संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यर्थ असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT