Corona raises tension again UP mask mandatory 24 hours 214 patients died in country sakal
देश

कोरोनाने टेन्शन पुन्हा वाढले!

यूपीत मास्क अनिवार्य; २४ तासांत देशात २१४ रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाने पुन्हा एकदा देशाला घाबरवायला सुरवात केली आहे. देशभरात रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात २ हजार १८३ रुग्ण आढळले तर २१४ रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश सरकारने मास्क अनिवार्य केला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापनाची याच आठवड्यात बैठक होत असून त्यात निर्बंध लावले जातील, अशी माहिती सूत्राने दिली.

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१८३ रुग्ण आढळले आहेत. ज्या रुग्णांना ताप, किंवा सर्दी असेल त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याच्या सूचना आरोग्य संस्थांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ४८ तासांच्या सूचनेत कोविड वॉर्ड तयार करण्याचे कळविण्यात आले आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५४२ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ५ लाख २१ हजार ९६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, या कालावधीत एकूण ४ कोटी २५ लाख १० हजार ७७३ रुग्ण दुरुस्त झाले आहेत.

दिल्ली गेल्या २४ तासात कोरोनाचे ५१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, २४ फेब्रुवारीला ४.३ संसर्गदरासह ५५६ नवीन रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, दिवसभरात कोरोनाच्या १२ हजार २७० चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर २६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गृह विलगीकरणात ९६४, रुग्णालयात ६६, आयसीयूमध्ये ९, ऑक्सिजन सपोर्टवर १० रुग्ण आहेत. नोएडामध्ये मुलांना झपाट्याने संसर्ग होत आहे, २४ तासात ६५ नवीन कोरोना बाधित आढळले, ज्यात १८ वर्षाखालील १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विशेषत: लहान मुलांत कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT