corona report
corona report 
देश

CoronaUpdate : देशातील रुग्णसंख्येच्या तब्बल 65% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 35,871 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही  1,14,74,605 वर पोहोचली आहे. काल देशात जितके रुग्ण सापडले आहेत त्यातील तब्बल 65 टक्के रुग्ण हे फक्त एकट्या महाराष्ट्र राज्यातील आहे. महाराष्ट्रात सापडलेली कालची आकडेवारी ही गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील आकडेवारीशी साधर्म्य दाखवणारी आहे. 

काल देशात 17,741 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,10,63,025 वर पोहोचली आहे. काल देशात 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,59,216 वर पोहोचली आहे. सध्या देशात 2,52,364 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

देशात आजवर एकूण 3,71,43,255 जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल कोरोनाच्या एकूण 10,63,379 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 23,03,13,163 वर पोहोचली आहे. 

राज्यात काल 23,179 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.  तसेच काल नवीन 9,138 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 21,63,391 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,52,760 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.26% झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT