Corona restrictions back mask mandatory again in karnataka delhi aiims know detail
Corona restrictions back mask mandatory again in karnataka delhi aiims know detail  
देश

Corona Restrictions : कोरोनाचा धोका वाढतोय! आपल्या शेजारच्या राज्यात झाली मास्कसक्ती

सकाळ डिजिटल टीम

Corona Restrictions in Karnataka : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना वेगाने पसरत असतानात, भारतात कोरोनाला रोखण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारेही सतर्क झाली आहेत. कोरोनापासून संरक्षणासाठी राज्य सरकारांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

कोविडच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य कर्नाटकातील सर्व बंद इमारतींमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. या संदर्भात, आरोग्य विभागाने कोविड सुरक्षा प्रोटोकॉल जारी केला आहे आणि लोकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.

कर्नाटकात मास्क अनिवार्य

कर्नाटकात पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.आरोग्य विभागाने जारी केलेल्या अॅडवायजरी मध्ये सर्व बंद इमारतींमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

याशिवाय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅंडम कोविड चाचणीही केली जाईल. यासोबतच सरकार दररोज 2,000-4,000 रुग्णांची कोविड चाचणी करणार आहे. यासोबतच सर्व जिल्हा रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच बूस्टर डोस देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

देशात आणखी कुठे मास्कसक्ती?

दुसरीकडे, एम्स दिल्ली (AIIMS Delhi) मध्येही मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत . AIIMS प्रशासनाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे की आता एम्सच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या परिसरात कोविड नियमांचे पालन करावे लागेल. यासोबतच आता कॅम्पसमध्ये प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही मास्कसक्ती परत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील मुंबा देवी मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना मंदिरात दर्शनावेळी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय आग्राच्या ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या सद्यस्थितीबाबत आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेतली.

पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या व्यतिरिक्त अनेक वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य तज्ञ देखील या बैठकीला उपस्थित होते. देशात ओमिक्रॉनच्या BA.7 सब-व्हेरिएंटची चार प्रकरणे आढळल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही बैठक बोलावण्यात आली आहे. व्हायरसचा हा प्रकार चीनमध्ये कोरोनाच्या फैलावासाठी जबाबदार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT