Corona Update 1.jpg 
देश

कोरोना 6 महिन्यांच्या उच्चांकावर; 24 तासांत 81,466 नवे रुग्ण, 469 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- देशात कोरोनाने विक्राळ रुप धारण केल्याचे दिसत आहे. सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना सहा महिन्यांच्या उच्चांकावर आहे. भारतात गेल्या वर्षीसारखी स्थिती बनत आहे. मागील 24 तासांत देशभरात 81 हजार 466 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर दुसरीकडे 469 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा 1 लाख 63 हजार 396 इतका झाला आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. 

एकीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. मागील 24 तासांत समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात 6,14,696 सक्रिय रुग्ण आहेत. तर मागील 24 तासांत 50,356 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर देशभरात कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही 1,15,25,039 झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, देशातील आठ राज्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात येत आहे. मागील 24 तासांत नोंदवण्यात आलेल्या 84.61 टक्के रुग्णांसाठी देशातील 8 राज्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तमिळनाडू, गुजरात आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे. 

दरम्यान, मागील 24 तासांत विक्रमी 36,71,242 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यापूर्वी 22 मार्चला सर्वाधिक 34.28 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली होती. त्यानंतर 6,87,89,138 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT