Omicron variant In India esakal
देश

भारतात कोरोनानंतर ओमिक्राॅनचं संकट; 'या' राज्यात सर्वाधिक फैलाव

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचं संकट संपलेलं नसतानाच ओमिक्राॅन व्हेरिएंटनं डोकं वर काढलंय.

Corona Omicron Infection : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचं (Corona Omicron Virus) संकट संपलेलं नसतानाच ओमिक्राॅन व्हेरिएंटनं डोकं वर काढलंय. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळं सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलंय. दिवसागणिक याचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यांत हा व्हेरिएंट हातपाय पसरत आहे.

महाराष्ट्रात रविवारी सहा रुग्ण सापडले असून राज्यात एकूण 141 वर आकडा पोहचला आहे. त्यामुळं आरोग्य विभागाचं टेन्शनही वाढलंय. यातच आता ओमिक्राॅनची नवनीन गंभीर लक्षणं दिसत आहेत. त्यामुळं चिंतेत आणखी भर पडलीय. यूकेच्या अभ्यासानुसार, जर तुम्हाला सर्दी सारखी लक्षणे आहेत. जसं की, श्वासोच्छोवास करताना फुरफूर आवाज, डोकेदुखी आणि थकवा येणं ही लक्षण असल्यास कोविडच्या ओमिक्रॉन प्रकारासाठी तुम्ही पाॅझिटिव्ह असण्याची शक्यता आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 6,563 नवीन कोविड-19 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं (Ministry of Health) दिलीय. कोविड महामारीच्या सुरुवातीपासून देशातील एकूण रुग्णांची संख्या 3,47,46,838 वर पोहोचलीय. भारतातील सक्रिय केसलोड सध्या 82,267 आहे, तर ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटनमुळे चिंता वाढली असून भारतातील एकूण ओमिक्रॉनची संख्या 578 आहे. त्यामध्ये सर्वाधिक केसेस दिल्ली, महाराष्ट्रात (Delhi Maharashtra) आहेत. त्यामुळं आता आरोग्य विभागाचं टेन्शनही वाढलंय.

भारतात ओमिक्राॅन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांची संख्या

  • दिल्ली 142

  • महाराष्ट्र 141

  • केरळ 57

  • गुजरात 49

  • राजस्थान 43

  • तेलंगणा 41

  • तमिळनाडू 34

  • कर्नाटक 31

  • मध्य प्रदेश 9

  • आंध्र प्रदेश 6

  • पश्चिम बंगाल 6

  • हरियाणा 4

  • ओडिसा 4

  • चंदिगड 3

  • जम्मू आणि काश्मीर 3

  • उत्तर प्रदेश 2

  • हिमाचल प्रदेश 1

  • लडाख 1

  • उत्तराखंड 1

  • एकूण : 578

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT