Corona Test sakal
देश

Corona Update : देशात पाच महिन्यानंतर सर्वात कमी सक्रीय रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात 3 लाख 63 हजार 605 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात 36 हजार 571 नवीन रुग्ण आढळले. तर सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या देशात 3 लाख 63 हजार 605 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 150 दिवसात ही सर्वात कमी सक्रीय रुग्णांची संख्या आहे. देशात रिकव्हरी रेट 97.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाण हे 1.12 टक्के इतकं आहे. मार्च 2020 नंतर हे सर्वात कमी प्रमाण आहे. गुरुवारी दिवसभरात 36 हजार 555 जण कोरोनामुक्त झाले.

भारतात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 3 कोटी 15 लाख 61 हजार 635 इतकी झाली आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत रिकव्हरी रेटमध्येही मोठी वाढ झाली आहे. तसंच आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट सातत्यानं कमी होत असून ही बाब दिलासादायक अशी आहे. सध्या आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 1.93 टक्के इतका आहे. गेल्या 56 दिवसांपासून हे प्रमाण 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याशिवाय दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.94 टक्के आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना देशातील लसीकरण मोहिमही वेगाने सुरु आहे. आतापर्यंत देशा 57 कोटी 22 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत 50 कोटी 26 लाख 99 हजार 702 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गुरुवारी एका दिवसात 18 लाख 86 हजार 271 जणांची कोरोना चाचणी झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT