corona updates 
देश

दिलासादायक! दुसरी लाट ओसरतेय, 24 तासात 1.86 लाख नवे रुग्ण

सूरज यादव

एका दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 9 टक्के इतका आहे. सलग चौथ्या दिवशी हे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात 1 लाख 86 हजार 364 नवीन रुग्ण आढळले. गेल्या 44 दिवसातील ही सर्वात कमी संख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 23 लाख 43 हजार 152 इतकी आहे. तर गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णांच्या संख्येत 76 हजार 755 ने घट झाली.

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 86 हजार नवीन रुग्ण सापडले तर 3 हजार 660 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत देशात एकूण 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी एका दिवसात 2 लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत देशात 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे 90.34 टक्क्यांवर पोहोचले आहेत

आठवड्याभरात पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्के इतका असून एका दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 9 टक्के इतका आहे. सलग चौथ्या दिवशी हे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु असून आतापर्यंत 20 कोटी 57 लाख डोस देण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्रालयाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT