Corona Update 
देश

Corona Update : कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 96 लाखांच्या पार; तर 90 लाख लोक आतापर्यंत कोरोनामु्क्त

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षापासून कोरोना नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतासह सर्वच जगभरात या विषाणुचे विपरित परिणाम पहायला मिळाले आहेत. युरोपातील अनेक राष्ट्रांत सध्या दुसरा लॉकडाऊन सुरु आहे. या विषाणूमुळे भारतात देखील हाहाकार माजला आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या ही आधीपेक्षा कमी असली तरीही परिस्थिती संपूर्णत: हातात नाहीये. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36,652 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 96 लाखांच्या पार गेली आहे. यामधील 90 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. सध्या कोरोना संक्रमणापासून मुक्त होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 94.20 टक्के झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाकडून दररोज सकाळी आठ वाजता कोरोनाबाबतची नवी आकडेवारी जाहिर होते. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 36,652 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह एकूण कोरोनाबाधितांची संख्या 96,08,211 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासांत 512 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या मृतांसह एकूण मृतांची संख्या 1,39,700 झाली आहे. 

देशात आतापर्यंत 90,58,822 लोक संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. सध्या देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.45 टक्के आहे. या नव्या आकड्यांनुसार, सध्या 4,09,689 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण कोरोनाबाधितांच्या 4.35 टक्के लोकांवर हा उपचार सुरुय. गेल्या काही दिवसांपासून ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या पाच लाखाहून कमी राहिलेली आहे. तर गेल्या 24 तासांत 42,533 लोक हॉस्पिटलमधून बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT