covid 19 update 
देश

Corona Update - देशात एकूण रुग्णसंख्या 58 लाखांपेक्षा जास्त; मृत्यू दर झाला कमी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतात गेल्या आठवड्याभरात नव्या कोरोना बाधितांची संख्या 90 हजारांपेक्षा कमी आढळली आहे. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 18 हजार 571 इतका झाला असून गेल्या 24 तासात 86 हजार 52 नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी दिवसभरात 1141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या 92 हजार 290 इतकी झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची आणि मृत्यूची आकडेवारी वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे.

एका दिवसात भारतात 77 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सहा दिवसांनी कोरोना बाधितांची संख्या ही रिकव्हरी झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 47 लाख 56 हजार 165 रुग्ण ठणठणीत झाले असून सध्या देशात 9 लाख 70 हजार 116 रुग्ण आहेत.

देशात सहा दिवसांमध्ये कोरोनाची आकडेवारी दिलासा देणारी अशीच आहे. नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसून आली आहे. सध्या 9 लाख 66 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 17 सप्टेंबरला ही आकडेवारी 10.17 लाख इतकी होती. म्हणजेच गेल्या सहा दिवसात 51 हजार रुग्ण बरे झाले. 12 सप्टेंबरला सर्वाधिक 24 हजार सक्रीय रुग्ण वाढले होते. भारतात टेस्टिंगची आकडेवारी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे. त्यानुसार 24 सप्टेंबरपर्यंत एकूण 6 कोटी 89 लाख सँपल टेस्ट करण्यात आली. त्यापैकी गुरुवारी 15 लाख टेस्टिंग झाल्याचं आयसीएमआरने म्हटलं आहे.

भारतातील मृत्यू दर आणि सक्रीय रुग्णांचे प्रमाण सातत्याने कमी होत असून ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मृत्यू दरात घसरण होऊन तो 1.58 टक्के इतका झाला असून सक्रीय रुग्णसंख्येचं प्रमाणही 17 टक्के इतकं झालं आहे. याशिवाय रिकव्हरी रेट म्हणजेच बरे होण्याचं प्रमाण 82 टक्के इतकं आहे. भारताचा रिकव्हरी रेट वाढत चालला आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी 19 हजार 164 नवे रुग्ण आढळले तर 17 हजार 184 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एका दिवसात राज्यात 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 82 हजार 963 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 9 लाख 73 हजार 214 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या 2 लाख 74 हजार 993 जण उपचार घेत आहेत.

जगभरात अमेरिका, ब्राझीलसारख्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूच्या आकडेवारीत घट झाली आहे. भारत एकमेव असा देश आहे जिथं कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. जगात सर्वाधिक कोरोना बाधित असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर मृत्यूच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत दुसरा असा देश आहे जिथं सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. मात्र कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत 71 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT