Corona. 
देश

Corona Update : महाराष्ट्रात रुग्णवाढ सुरुच; देशात नवे 24,492 रुग्ण

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 24,492 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरचे एकूण रुग्ण 1,14,09,831 झाले आहेत. काही दिवसांपूर्वी देशात 8 ते 9 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. पण, आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून चिंता वाढली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा 26 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्चला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे.

गेल्या 24 तासांत 20,191 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,10,27,543  वर पोहोचली आहे. देशात काल 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,58,856 वर पोहोचली आहे. सध्या देशात 2,23,432 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात 3,29,47,432 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

राज्यात आज 15051 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10671 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2144743 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 130547 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.07% झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना स्थिती बिघडत चालल्याने राज्यात नव्या कठोर निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. तसेच अनेक राज्ये कर्फ्यू करण्याबाबत विचार करत आहेत. शिवाय अनेक राज्यांमध्ये हळूहळू निर्बंध लावले जात आहेत. लोकांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा; पुढील ६० ते ७२ तासांत तापमानात मोठी वाढ

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT