Corona Test sakal
देश

देशात २४ तासात २.४७ लाख नवे रुग्ण; ओमिक्रॉनबाधितांची संख्या ५४८८

सकाळ डिजिटल टीम

बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी नव्या रुग्णांची संख्या तब्बल २७ टक्क्यांनी वाढली आहे.

भारतात कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेत नव्या रुग्णांच्या संख्योत मोठी वाढ होत आहे. बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी नव्या रुग्णांची संख्या तब्बल २७ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात २ लाख ४७ हजार ४१७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८४ हजार ८२५ जण कोरोमुक्त झाले. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ११ लाख १७ हजार ५३१ इतकी आहे.

ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कालच्या तुलनेत आज जवळपास सहाशे ओमिक्रॉन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत देशात ५ हजार ४८८ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. तर देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १३.११ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये आठवड्याचा संसर्ग दर हा ५ टक्क्यांहून जास्त आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडु, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात या राज्यातील परिस्थिती चिंताजनक अशी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी अशी माहिती दिली की, कोरोनाच्या संसर्गात ३० डिसेंबरला १.१ टक्के वाढ झाली. तर हेच प्रमाण बुधवारी ११.०५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. जगभरात १० जानेवारीला ३१ लाख ५९ हजार कोरोनाचे रुग्ण आढळले होते. आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT