Corona Patient Update In India  sakal
देश

देशात सक्रीय रुग्णसंख्येत मोठी घट; कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं

सकाळ डिजिटल टीम

तीन दिवसांनंतर देशात एका दिवसात मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजारहून कमी झाली आहे.

देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry Of India) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ५८ हजार ७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख ५० हजार ४०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. (India Corona Update Today)

तीन दिवसांनंतर देशात एका दिवसात मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजारहून कमी झाली आहे. काल दिवसभरात देशात कोरोनामुळे ६५७ जणांचा मृत्यू झाला. ६ फेब्रुवारीला देशात ८९५ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले होते. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.९८ टक्के इतका खाली आला आहे.

सध्या देशात नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्याही कमी होत चालली आहे. सध्या देशात ६ लाख ९७ हजार ८०२ कोरोनाचे रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी २५ लाख ३६ हजार १३७ वर पोहोचली आहे. याशिवाय ४ कोटी १३ लाख ३१ हजार १५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५ लाख ७ हजार १७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT