corona uttar pradesh 11 more corona positive cases in moradabad 
देश

पोलिसांवर दगडफेक केलेल्या भागात कोरोनाचा कहर...

वृत्तसंस्था

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : पोलिसांवर दगडफेक केलेल्या भागात कोरोना व्हायरसने कहर केला असून, नव्याने 11 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या 11 जणांमध्ये सरताजचा तिसरा भाऊही आहे.

मुरादाबाद येथो कोरोनाचे रुग्ण असल्याचे समजल्यानंतर पोलिस गेले होते. यावेळी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती. मुरादाबादच्या नवावपुरा मोहल्ला येथे राहणारे सरताज यांचा 13 तारखेला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सरताजच्या एका भावाचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. सरताजचा तिसरा भाऊही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे, अन्य कुटुंबियांचा अहवाल अद्याप आलेला नसून, पुढील दोन दिवसात येणार आहे. सरताज आणि सरताजच्या भावाचा दिल्लीमधील जमातींशी संबंध होता.

मुरादाबादमधील दगड फेकणारे म्हणत होते की, कोरोनाच्या बहाण्याने सरकार आमचा छळ करीत आहे. आमचा अल्लाह आम्हाला कोरोनापासून वाचवेल. पण आता अहवाल समोर आला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. सरताजच्या कुटूंबाची हळूहळू बातमी समोर येत असून, प्रत्येकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकला आहे. दरम्यान, संपूर्ण मुरादाबाद लॉकडाऊन आहे. मुरादाबादमध्ये 17 जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरित दगडफेक करणार्‍यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

SCROLL FOR NEXT