corona vaccination 
देश

Corona Vaccination : पहिल्या दिवशी सरकार लक्ष्यापासून दूर राहिले; पण...

सकाळ ऑनलाईन टीम

Corona Vaccination :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी देशातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत पहिल्या दिवशी देशात किती लोकांना लस देण्यात आली यासंदर्भातील माहिती दिली. कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी 1 लाख 65 हजार 714 लोकांनाच लस देण्यात आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनपत्रकारपरिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी देशभरातील  1 लाख 65 हजार 714 लोकांना लस टोचण्यात आली. यापूर्वी सरकारने पहिल्या दिवशी 3 लाख लोकांना लस टोचण्याचे टार्गेट ठेवले होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन पहिल्या दिवशी टार्गेट पूर्ण करण्यात सरकार मागे पडल्याचे दिसते.  

लसीकरणासाठी  3,351 केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रावर  16,755 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लस दिलेल्या  कोणत्याही व्यक्तीला दुष्परिणाम झालेला नाही. तसेच कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही, ही दिलसादायक माहितीही आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. बिहारमध्ये 16 हजार 401 लोकांना लस टोचण्यात आली.  दुसरीकडे दिल्लीत 3403, गुजरातमध्ये 8557 लोकांना लस देण्यात आली.  उत्तर प्रदेशमध्ये 15 हजार 975 लोकांना लस टोचण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

IND vs WI: भारताविरुद्धच्या T20-वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; धाकड खेळाडूची झाली दमदार वापसी, पहा संपूर्ण संघ

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज! मध्य रेल्वेसह हार्बरवर २२ विशेष लोकलची घोषणा; कधी कोणती धावणार?

बोलता-बोलता सलमान खानच्या छातीत उठल्या तीव्र कळा ; पाणी मागितलं, डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं, बिग बॉसच्या घरातील Viral Video

Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; 500 मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...

SCROLL FOR NEXT