zycov d 
देश

ZyCoV-D लशीची पहिली बॅच केंद्र सरकारकडे सुपूर्द

सकाळ डिजिटल टीम

भारत सरकारने झायडस कॅडिला कंपनीकडे १ कोटी डोसची ऑर्डर दिली होती. झायकोव्ह डी ही जगातील पहिली DNA बेस्ड कोरोना लस तयार केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना (Coronavirus) लढ्यात भारताला (India) आणखी एक लस मिळाली आहे. फार्मा कंपनी झायडस कॅडिलाकडून (Zydus Cadila) झायकोव्ह डी लसीचा पुरवठा सुरु केला आहे. पहिल्या टप्प्यातील साठा भारताकडे सुपुर्द कऱण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. नोव्हेंबरमध्ये भारत सरकारने कोरोना लशीच्या (Vaccine) १ कोटी डोसची ऑर्डर मिळाल्याचं कंपनीने सांगितलं होतं.

झायडस कॅडीला कंपनीने झायकोव्ह डी ही जगातील पहिली DNA बेस्ड कोरोना लस तयार केली आहे. ही लस ७७ टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं चाचणीतून समोर आलं होतं. भारत सरकारने २६५ रुपये प्रतिडोस या दराने लशीची खरेदी केली आहे. तसंच सुई नसलेल्या एप्लिकेटरसाठी प्रत्येकी ९३ रुपये जीएसटी वगळून द्यावे लागणार असल्याचं कंपनीने सांगितलं होतं.

झायडस कॅडीलाची ही लस ३५८ रुपयांना (करांव्यतरिक्त) उपलब्ध होणार आहे. या किमतीमध्ये ९३ रुपये किमतीच्या ‘जेट ॲप्लिकेटर’चाही समावेश आहे. या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक डोस २८ दिवसांच्या मुदतीने घ्यायचा आहे. ही डीएनए आधारित व सुई विरहित लस आहे.

‘झायकोव्ह-डी’ या लसीला २० ऑगस्ट रोजी औषध नियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. या लसीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ३० सप्टेंबर रोजी सांगितले होते. दर महिन्याला एक कोटी लसींचे डोस देण्याची क्षमता झायडस कॅडिला कंपनीची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT