देश

भन्नाट आजोबा; बॉडीलोशनप्रमाणे करतात सॅनिटायझरचा वापर

आता कशाला राहतोय कोरोना? हा video एकदा पाहाच

शर्वरी जोशी

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तीन प्रमुख उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यात सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि मास्क वापरणे या तीन गोष्टी आवर्जुन केल्या पाहिजेत. म्हणूनच, आज प्रत्येक जण हात धुतांना किंवा सॅनिटायझरचा वापर करतांना दिसतो. प्रत्येक नियमांचं पालन करावं. मात्र, त्याचा अतिरेक होणार नाही याकडेही लक्ष द्यावं. आजकाल अनेक जण सॅनिटायझरचा अतिरेकी वापर करतांना दिसतात. यामध्येच सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी या आजोबांनीच चक्क संपूर्ण शरीराला सॅनिटायझर (sanitizers) लावलं आहे. विशेष म्हणजे बॉडीलोशन (body lotion) असल्याप्रमाणे ते सॅनिटायझर लावत आहेत.(corona-video-chachas-cannot-be-stopped-the-sanitizers-look-like-they-are-applying-body-lotion-watch-the-video)

व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा वेटिंग रुममध्ये बसल्याचं दिसून येत आहे. यावेळी एक मुलगा येऊन त्याने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हात सॅनिटाइज करण्यासाठी सॅनिटायझर दिलं. विशेष म्हणजे या आजोबांनी केवळ हाताच नाही तर चक्क संपूर्ण शरीर सॅनिटाइज केलं आहे. आजोबांनी हातासोबतच पाय, चेहरा, डोकं आणि केस असं संपूर्ण शरीराला सॅनिटायझर लावलं. मात्र, सॅनिटायझर लावण्याच्या नादात त्यांचा मास्क खालती पडला.

हा व्हिडीओ शेअर करत कोरोनासुद्धा या आजोबांचा केस वाकडे करु शकणार नाही. पण, काका तो मास्क काढायला नको होतात, असं कॅप्शन रुपिन शर्मा यांनी दिलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून हसून बेजार झाले आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला चार हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर ४०० पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT