tedros adhanom ghebreyesus esaka 
देश

Corona: WHO प्रमुखांनी हिंदीमध्ये ट्विट करत भारताचे मानले आभार; वाचा कारण

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटींच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत जगभरात कोरोना विषाणूवरील औषध आणि लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. यात जागतिक आरोग्य संघटना (WHO) महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनम यांनी हिंदीमध्ये ट्विट करत भारत आणि साऊथ आफ्रीकेचे आभार मानले आहेत. कोरोना लशीची उपलब्धतता आणि वितरण प्रकरणी त्यांनी या देशांना धन्यवाद केले आहे.

बौद्धिक संपदेच्या (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी) मुद्द्यावर कोविड- 19 च्या संदर्भात पुनर्विचाराच्या सूचनेबद्दल भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे धन्यवाद. यामुळे लस, औषध कमी किंमतीमध्ये उपलब्ध करुन देण्यास चालना मिळेल. त्यांचे पाऊल प्रशंसनीय आहे, असं डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस म्हणालेत. 

'असल्या भाषेचं आजिबात समर्थन करू नका'; राहुल गांधी कमलनाथांवर गरजले

ऑक्टोंबरच्या सुरुवातीला भारताने जागतिक आरोग्य संघटनेला विनंती केली होती की, विकसनशिल देशांसाठी कोरोना लशीचे उत्पादन आणि आयात सोपी बनवण्यासाठी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे नियम थोडे शिथिल बनवले जावेत. दक्षिण आफ्रिकेनेही यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहिले होते. 

कोरोना महामारी थैमान घालत असताना इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टीचे नियम शिथिल करण्याचे आवाहन पत्रामध्ये करण्यात आले होती. यामुळे विकसनशील देशांना लस निर्मितीत आणि लस मिळण्यामध्ये मदत मिळणार आहे. काही काळासाठी लशीच्या निर्मितीवर पेटेंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराईटचे बंधने नसल्याचा फायदा गरीब देशांना होणार आहे. इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टीचे नियम शिथिल करण्यात आल्यास कोरोना लस स्वस्तात मिळणेही शक्य होईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT