Corona XE type introduced in India
Corona XE type introduced in India Corona XE type introduced in India
देश

कोरोना XE चा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली; वेगाने पसरणारा!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनाचा (coronavirus) नवीन प्रकार XE ने भारतातही दस्तक दिली आहे. याचा पहिला रुग्ण बुधवारी (ता. ६) मुंबईत नोंदवण्यात आला आहे. एकूण ३७६ नमुने घेण्यात आले. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाचे XE प्रकार आढळून आला. अशा परिस्थितीत आता XE व्हेरिएंटचा शोध चिंता वाढवणार आहे. (Corona XE type introduced in India)

कोरोना विषाणूचा (coronavirus) नवीन प्रकार XE भारतातही दाखल झाले आहे. हा नवीन प्रकार युनायटेड किंगडममधून आला आहे. बीएमसीने आपल्या ताज्या सेरो सर्वेक्षणात म्हटले आहे की, शहरात XE प्रकार आणि कप्पा प्रकारातील प्रत्येकी एक प्रकरणाची पुष्टी झाली आहे. एकूण २३० लोकांचे अहवाल सेरो सर्वेक्षणासाठी पाठवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापैकी २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणालाही ऑक्सिजन किंवा गहन निरीक्षणाची आवश्यकता नाही.

आयआयटी कानपूरच्या अंदाजानुसार, जून २०२२ पर्यंत भारतात कोरोना संसर्गाची चौथी लाट येऊ शकते. मात्र, देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची नवी लाट पूर्वीसारखी प्राणघातक असेल अशी अपेक्षा नाही.

हा प्रकार वेगाने पसरणारा!

XE प्रकाराबाबत जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, हा प्रकार ओमिक्रॉन प्रकारातील BA.1 आणि BA.2 या दोन प्रकारांनी बनलेला आहे. त्याची पहिली केस यूकेमध्ये आढळून आली. यावेळी त्याला XE प्रकार असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भीती व्यक्त केली आहे की, हा प्रकार सर्वांत वेगाने पसरणारे सिद्ध होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT