ANI
देश

गुजरात : साबरमतीच्या पाण्यात कोरोना विषाणू

सूरज यादव

पहिल्यांदाच नदीमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. गुजरातमध्ये साबरमती नदीच्या पाण्यात कोरोना विषाणू असल्याचे समोर आले आहे.

अहमदाबाद - जगात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता नव नव्या स्परुपात सापडत आहे. भारतात सांडपाण्यामध्ये कोरोना व्हायरस सापडल्याची उदाहरणे समोर आली होती. मात्र पहिल्यांदाच नदीच्या पाण्यात कोरोना विषाणू आढळला. गुजरातमध्ये साबरमती नदीतील पाण्याचे नमुने तपासले असता ही बाब समोर आली. आयआयटी गांधीनगर आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील संशोधकांनी नमुने तपासले होते.

साबरमती नदीतून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळला. अहमदाबादमधील कांकरिया, चंदोला तलाव इथूनही नमुने घेण्यात आले होते. प्रा. मनिषकुमार म्हणाले, नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस आढळणे ही चिंतेची बाब आहे. अशा स्वरुपाची तपासणी देशभरात झाली पाहिजे. यापूर्वी सांडपाण्यात कोरोना विषाणू असल्याचे समोर आले होते. मात्र नदीत कोरोना विषाणू आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. 'इंडिया टुडे'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

३ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२० या कालावधीत साबरमती नदीतील पाण्याचे ६९४ नमुने, कांकरिया तलाव येथून ५४९ आणि चंदोला तलाव येथून ४०२ नमुने गोळा करण्यात आले होते, अशी माहिती प्रा. मनिषकुमार यांनी दिली.

सांडपाण्यात कोरोना आढळल्यानंतर संशोधकांनी स्वच्छ पाण्यावर संशोधन सुरु केले होते. अहमदाबादमध्ये सर्वाधिक वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लांट आहेत. तर गुवाहाटीमध्ये एकही नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांची निवड करण्यात आली होती. साबरमती नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदुषण वाढलं आहे. अनेक नमुन्यांमधून तर नदीचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये नरोडा, ओढव वटवा आणि नारोल भागातील उद्योगधंद्याचे प्रदुषित पाणी नदीत मिसळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT